Sunday, February 04, 2007
माझे आराध्य दैवत पंडित भीमसेन जोशी यांचे ८६ व्या वर्षात पदार्पण
काय योगायोग आहे. आजच सकाळी अनेक दिवसांनी पंडितजीनचे "मिया की तोडी" ऐकले आणि आजच स्वर भास्कर पंडीत भिमसेन जोशी ह्यानी ८६ वर्षात पदार्पण केले. मला आज ही ठलक पणे आठवत आहे. मी पंडीतजींना सर्व प्रथम पुण्यातल्या राघवेन्द्रस्वामी मठ मधे पाहिले/ऐकले होते. तेव्हा कधी माझ्या मनाने पंडीतजींना माझे गान दैवत बनावले कळालेच नाही.
त्या नंतर मी त्यांचे अनेक मेह्फ़िलि ऐक्ल्या, अनेक ध्वनी फ़ीत विकत घेत ल्या . पण अजुन ही सर्व कमीच वाटते.हे फ़क्त मलच नव्हे तर सर्व रसिक श्रोत्यां असेच वाटत असणार. ह्यची प्रचिति सवाई गंधर्व मधे येते. शेवट च्या दिवशी कोणी पण पंडीतजीनचे बुलंद गायकीचा अस्वाद घेतल्या शिवाय जात नाही. उलट त्या वेळी मांडव तुदुंब भरुन जातो.अपना सर्वानकरीता ही सकाळ मधली बातमी कॉपी करत अहे.
हा माझा मराठी मधला पहिलाच ब्लॉग आहे. तेव्हा अनेक चुका झाल्या आहेत. हळु हळु सुधार होइल :).
-अमित
पुणे, ता. ४ - ""रसिकांची सेवा करण्याची संधी आजवर मिळाली; पण आता शरीर साथ देत नाही. मलाही लवकरात लवकर गाण्याची इच्छा आहे. डॉक्टरांनी "हो' म्हटले की रसिकांची सेवा पुन्हा सुरू करीन,'' ...ज्यांच्या बुलंद गायकीची मोहिनी रसिकांवर आजही आहे ते स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी सांगत होते. ......पंडितजींनी आज ८६ व्या वर्षात पदार्पण केले. सकाळपासून त्यांना शुभेच्छा देणारे दूरध्वनी खणखणत होते. हिरव्या काठांची किनार असणारी लुंगी, रेशमी शर्ट आणि शाल अशा पोशाखात पंडितजी अतिशय प्रसन्न मुद्रेने प्रत्येकाचे स्वागत करत होते. त्यांचे शिष्य, कलाकार, चाहते, रसिक... साऱ्यांची चौकशी ते जातीने करत होते. जुने संदर्भ सांगत होते. युवा गायिका मंजूषा कुलकर्णी मूळची सांगलीची आणि काणेबुवांची शिष्या, हा तपशीलही त्यांना आठवत होता. माध्यमांच्या प्रतिनिधींचेही स्वागत ते "या पत्रकार' असे म्हणत करत होते. "चांगले संगीत ऐकून मी झोपायचो; पण अलीकडचे संगीत ऐकून झोप उडते,' अशी मिस्कील टिप्पणी करत ते म्हणाले, ""हल्ली सुधारणा दिसतात; पण त्यामुळे "गडबडी' वाढत चालल्या आहेत. रसिकांना तृप्त करण्याची माझी आजही मनापासून इच्छा आहे. ईश्वराने मला ती संधी द्यावी.'' आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सहसचिव आणि प्रसिद्ध गायक श्रीकांत देशपांडे, खजिनदार गोविंद बेडेकर, उपेंद्र भट, मुकुंद गद्रे, मोहन दरेकर, राजेंद्र कंदलगावकर, रघुनंदन पणशीकर, हेमा उपासनी, मंजूषा कुलकर्णी-पाटील, तबलावादक भरत कामत अशा अनेकांनी त्यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
चांगली सुरुवात आहे.
Post a Comment